संपादकीय

सोप्या भाषेत शिका इन्कमटॅक्स-सीए.गोविंदप्रसाद एस.मुंदडा

सोप्या भाषेत इन्कमटॅक्स आणि इन्वेस्टमेन्ट

images (60)
images (60)

इन्कमटॅक्स अधिकाऱ्यावर कार्यवाही होऊ शकते का ? सीए. गोविंदप्रसाद एस. मुंदडा जालना सीए. आकाश जी. मुंदडा सध्या आपण सर्व्हे बद्दल चर्चा करित आहोत. आज आपण बघणार आहोत की इन्कमटॅक्स अधिकाऱ्याने जर करदात्याची बळजबरी सही घेतली असेल तर त्याचे इन्कमटॅक्स अधिकाऱ्याना तसेच करदात्यावर काय काय परिणाम होऊ शकतात. अशा अनेक बाबी सोप्या भाषेतील प्रश्नोतर रुपात बघणार आहोत

प्रश्न – इन्कमटॅक्स अधिकारी यांना खूप अधिकार असतात आणि या अधिकाराच्या जोरावर जर इन्कमटॅक्स अधिकाऱ्याने करदात्याने कागद न वाचु देता सह्या घेतल्या असतील तर त्याचे परिणाम काय होतील ?
अशी सही घेण्याचे अधिकार इन्कमटॅक्स अधिकाऱ्यास नाही. जर अशी सही इन्कमटॅक्स अधिकाऱ्याने घेतलीच असेल ही वस्तु स्थिती ज्याच्या कडे सर्व्हे चालु आहे अशा करदात्यांनी लगेच ही बाब संबंधित कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स च्या नजरेस आणून द्यायला हवी. असाच प्रसंग दिल्ली हायकोर्ट समोर आला हंसराज छाबरा विरुद्ध मुकेश मीत्तल, असीस्टंट कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स केस मध्ये असे झाले की सर्व्हे चालु असतांना दोन ग्राहक आलेले होते. त्या ग्राहकांना सुद्धा इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांनी बाहेर जाऊ दिले नाही. अशा प्रसंगी कोर्टाने ने असे दृष्टिकोन ठेवले की हे सर्व बरोबर नाही. त्यानी सी.आर.पी.सी. च्या 120 बी अनुसार प्राईमा फेसी दोषी ठरवले आणि इन्कमटॅक्स ऑफिसर यांना ट्रायल ला सामोरे जावे लागले. म्हणजेच सारांश मध्ये सोप्या भाषेत असे सांगता येइल की अशा इन्कमटॅक्स अधिकाऱ्या विरुद्ध एफ.आय.आर. सुद्धा दाखल करता येतो किंवा त्यांच्या विरोधात कोर्टात जाता येते. म्हणजेच करदात्यांना या प्रकारचे भरपुर अधिकार आहेत परंतु व्यवहारात जास्त करून कोणी ही करदाता याचा फायदा घेतांना दिसत नाही. (२)

प्रश्न – समजा करदात्यावर गैर कायदेशीर रित्या सर्व्हे चालु करण्यात आला परन्तु अधिकाऱ्यास तेथे करदात्याच्या विरोधात काही पुरावे सापडले तर हे पुरावे करदात्याच्या विरोधात वापरता येऊ शकतात का ?

उत्तर-
असाच प्रसंग राजस्थान कोटील कमल एण्ड कम्पनी विरुद्ध कमीशनर ऑफ इन्कमटॅक्स या केस मध्ये आला. आणि या प्रकरणात कोर्टाने असा निर्णय दिला की जर सापडलेली कागदपत्रे संबंधित करदात्याचेच असतील तर ती कागदपत्रे करदात्याच्या विरोधात वापरता येऊ शकतील. या बद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणाले हे आपण सविस्तर पुढील रविवारी बघणार आहोत. या शिवाय इन्कमटॅक्स ची अधिक ची माहिती बघणार आहोत जी व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावी.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!