जालना:अभाविपच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे जल्लोषात स्वागत
न्यूज जालना-
१५ ऑगस्ट पासुन भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे
सर्व भारतीयांसाठी ही आनंदाची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जालनाच्या वतीने दि.१४ व १५ ऑगस्ट या दोन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोविडची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यक्रम करणे शक्य नव्हते म्हणुन अभाविपच्या वतीने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला. याची सुरुवात म्हणून अभाविपने जिल्हाभरात ५००० कुटुंबांपर्यंत पोहोचून भारत मातेच्या प्रतिमेचे वाटप केले व १५ ऑगस्ट रोजी या प्रतिमेचे पूजन करण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले. यामध्ये जालना जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये संपर्क करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घरी घरी जाऊन ५००० प्रतिमांचे वाटप केले.
दि १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अभाविपने “वंदे मातरम्” या देश भक्ती पर गीतांचा कार्यक्रमाचे महात्मा गांधी पुतळा परिसरात आयोजन केले, या कार्यक्रमात १४ विद्यार्थी कलाकारांनी १० गाणी व २ पोवाडे सादर करत सर्व क्रांतीकारांची आठवण करून दिली, यावेळी कार्यक्रम बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती.
दि १५ ऑगस्ट रोजी कला क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना घेऊन अभाविपने पहाटेच्या वेळी जालना शहरातील १० प्रमुख चौकांमध्ये रांगोळी काढून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, यामध्ये अंबड चौफुली, मोती बाग, शनिमांदिर, गांधी चमन, मस्तगड, मामा चौक, बस स्टँड, भोकरदन नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वातंत्रवीर सावरकर पुतळा या परिसरात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात हा ७५ वा स्वातंत्र्य दीन साजरा केला. यावेळी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.