केंद्रातील जुल्मी सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हा- नाना पटोले
जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील जुल्मी मोदी सरकारला 2024 मध्ये घालविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकहिताची कामे करून जनसामान्यांना आधार द्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले.
जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुयशा लॉन्स सत्कार्यनगर जालना येथे धावत्या भेटीत सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पटोले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. याप्रसंगी माजी आ. कैल्याण काळे, अ.भा.काँग्रेसचे सदस्य भिमराव डोंगरे, रविंद्र दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, प्रभाकर पवार, जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, सत्संग मुंढे, गटनेते गणेश राऊत, युवानेते अक्षय गोरंट्याल, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, शेख शमशु, एकबाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना पटोले म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्या सैनिकांनी बलिदान दिलेले आहे. या बलिदानामुळे भारत देश स्वतंत्र्य झाला आहे. परंतू या हुतात्म्यांची केंद्र सरकारला जाणीव नाही. देशातील लोकशाही धोक्यात आणन्याचे काम भाजपा सरकार सातत्याने करीत आहेत. यामुळे भारतीय राज्यघटना आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. हे सरकार शेतकरी आणि गोरगरीब दिनदलितांच्या विरोधी असून भाडवलदारांची पाठराखण करण्यारे आहे. हे उघड-उघड दिसून येत आहे असे श्री पटोले म्हणाले. आ. कैलास गोरंट्याल आणि मी 1999 साली सोबत निवडून आलेलो आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे इथल्या स्थानिक नेत्याला घेवून श्री गोरंट्याल आणि मी मुख्यमंत्र्याकडे विधानपरिषदेमध्ये संधी द्या म्हणून गेलो होतो आणि श्री गोरंट्याल यांनी माझी कायमची डोकेदुखी साहेब दुर करा आणि शिवसेना नेत्यांचे नाव न घेता विधान परिषदेवर संधी द्या असे आम्ही म्हटलो होतो. परंतू तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा फार चालू पुरजा आहे असे सांगीतले होते. श्री पटोले यांच्या या वक्तव्याने संपुर्ण सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. श्री पटोले पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीची भरभक्कम तयारी करा आपल्याला स्वबळावर निवडणूकीच्या रिंगणात जायचे आहे. यावेळी आ. कैलास गोरंटयाल यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे म्हणून अनेक संघटना आणि संस्थांनी पटोले यांना शिष्टमंडळासह निवेदन दिल्यावर पटोले यांनी सकारात्मक मत व्यक्त करून श्री गोरंटयाल यांना निश्चितपणे मोठं केले जाईल असे सांगीतले.
यावेळी विमलताई आगलावे, बाबुराव सतकर, नगराध्यक्ष कासम गवळी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण मसलेकर, नवाब डांगे, अशोक साबळे, सुभाष मगरे, नगरसेवक महाविर ढक्का, जीवन सले, विष्णू वाघमारे, विनोद रत्नपारखे, अरूण मगरे, राजेंद्र वाघमारे, राज स्वामी, बालकृष्ण कोताकोंडा, संजय भगत, रमेश गौरक्षक, विनोद यादव, सय्यद करीम बिल्डर, चंद्रकांत रत्नपारखे, फकीरा वाघ, अंजेभाऊ चव्हाण, सोपान तिरूखे, गणेश खरात, कृष्णा पडूळ, संजय शेजूळ, नारायण वाढेकर, धर्मा खिल्लारे, राजु पवार, नदीम पहेलवान, मोहन इंगळे, जावेद अली, वैभव उगले, सलिम काजी, जावेद बेग, युवराज राठोड, निलेश दळे, अजीम बागवान, मनोज गुडेकर, अनस चाऊस, शिवाजी गायकवाड, वसीम कादरी, प्रविण रत्नपारखे, मयुर चित्राल, विष्णू भालेराव आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. जिल्हा सरचिटणीस राम सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
तृतीयपंथाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
महाविकास आघाडी सरकारने तृतीयपंथासाठी आर्थिक विकास कल्याण मंडळ स्थापन केल्यामुळे तृतीयपंथाच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला आणि या महामंडळावर सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई पवार यांना संचालक म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात अक्षरा तागडे, अश्विनी शेख, विद्या पोकळ, तनुजा पठाण आदींचा समावेश होता. या तृतीयपंथी शिष्टमंडळाने श्री पटोले यांना भावी मुख्यमंत्रीचा आशिर्वाद दिला.