जाफराबाद तालुका

जाफराबाद तालुक्यात युगंधर प्रतिष्ठानचा असाही पुढाकार

कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला किराणा आणि शालेय साहित्याची मदत
युगंधर प्रतिष्ठाण चा पुढाकार

images (60)
images (60)

जाफराबाद/ सुनील जोशी

बेलोरा ता. जाफराबाद येथील कोरोनाने निधन झालेल्या भूमीहीन व्यक्तीच्या कुटुंबाला युगंधर प्रतिष्ठाण च्या माध्यमातून किराणा, कपडे आणि मुलांसाठी शालेय साहित्य भेट देण्यात आले.

बेलोरा येथील शेळके यांचे काही महिण्यापूर्वी कोरोनाने निधन झाले होते, त्यांच्या पश्चात पत्नी मंगलाबाई शेळके 3 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे.मंगलाबाई या भूमीहीन असून मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

युगंधर प्रतिष्ठान च्या माध्यमातून नागपंचमी सणाचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबाला गोडेतेल, साखर, शेंगदाणे, हरबरा डाळ, तूर डाळ, रवा, पोहे, खोबरेल तेल, ड्रेस, साड्या, वही-रजिस्टर, साबण, धुण्याचा सोडा, स्कुल बॅग आदी साहित्य देण्यात आले.

यावेळी युगंधर चे अध्यक्ष विनोद कळंबे, प्रदिप मघाडे, प्रवीण अंभोरे, विष्णू वैद्य आदी उपस्तिथ होते.या उपक्रमासाठी नागेश डोमळे, गोपाल बांगड ,रमेश साळवे ,अतुल बुजाडे,सुधाकर चिंधोटे, अंकुश आढावे,दिलीप बापू जाधव, प्रल्हाद लोखंडे ,मधुर संतोषसेठ काबरा ,ज्ञानेश चव्हाण ,चैतन्य
चव्हाण,अल्ताफ शेख,विष्णू वैद्य, धनंजय मुळे , विनोद कळंबे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!