भूत, भानामती,करणी,मूठ; विज्ञान सांगते सब हे झूठ ! ;वाघ

जाफराबाद प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जवखेडा (ठेंग) येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात आयोजित जाहीर व्याख्यानात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितिचे जालना संघटक सुनील वाघ, यांनी विविध चमत्कार प्रात्यक्षिकांसह भूत मंत्रतंत्र यांच्यासह बाबा मांत्रिक तांत्रिक सामान्य लोकांना कशाप्रकारे लुबाडतात हे समजावून सांगितले. सोबतच भूत, भानामती,करणी,मूठ; विज्ञान सांगते सब हे झूठ ! त्यामुळे विज्ञानचे महत्व मोठे असल्याचे प्रतिपादन सुनील वाघ। यांनी केले

वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी कायदा आणि त्या अंतर्गत विविध कलमांचे उदाहरणासहित सखोल मार्गदर्शन करण्यात आले. देव धर्माला विरोध न करता त्यांच्या नावावर आर्थिक, शारीरिक फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात समितीचा लढा आहे असे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्रशांत वेडेकर(जिल्हा संघटक, अभा अनिंस युवा शाखा जालना) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.विशेष महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद घेऊन अत्यंत सूनियोजित असे आयोजन मा. सोनू शिंदे व मित्रमंडळ, विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांनी केले