गोरसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पावसातही उपोषण सुरूच
जालना/कुलदीप पवार
ओबीसींची जातिनिहाय जनगणना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदोन्नती मधील रद्द झालेले आरक्षण पूर्ववत करावे,रखडलेली प्राध्यापक भरती तात्काळ सुरू करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे.
हे साखळी उपोषण भरपावसातही सुरूच आहे.
ओबीसी घटकांवरील अन्याय दूर करावा यासह इतर मागण्यांसाठी हे उपोषण केले जात आहे. गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, व प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली एका गोरसेनेच्या शिष्टमंडळाने गत आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे साखळी उपोषणाचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने हे उपोषण सुरू आहे. उपोषणात जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर राठोड, जिल्हा सचिव रविंद्र राठोड, गणेश राठोड, अँड.रवि राठोड,बाळू राठोड,बाबु राठोड, अंकुश चव्हाण, आबासाहेब राठोड, शंकर चव्हाण,के के पवार, सतिष राठोड, सुनील पवार, युवराज राठोड, मच्छिंद्र पवार, संदिप चव्हाण, संदिप राठोड,राजू पवार, रामेश्वर आढे, यांच्या सह अनेक गोरसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.