घनसावंगी तालुका
आज कुंभार पिंपळगाव येथील प्रियदर्शनी बँकेत व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव येथील प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेत कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देऊन शासकीय योजनेचा कर्ज,व्यवसायिक कर्ज मिळण्यासाठी आज दि.24 मंगळवार रोजी दुपारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शक अँड.विलासराव खरात यांची उपस्थित राहणार आहेत.येथील व्यापारी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.