जालना क्राईम

जालन्यात गावठी पिस्तूलाची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एका पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त

जालना/ प्रतिनिधी

images (60)
images (60)

गावठी पिस्तूलाची खरेदी – विक्री करणाऱ्या टोळीचा सदर बाजार पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे . जालना शहरातील औरंगाबाद रोडवरील एका हॉटेलसमोर गावठी पिस्तूल खरेदी – विक्रीचा व्यवहार करण्यासाठी काही युवक आले असल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांना मिळाली होती .

या माहितीच्या आधारे रुपेकर यांच्यासह पोलीस पथकाने अचानक छापा मारला . यावेळी एका संशयिताच्या ताब्यातील पिशवीतून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली . ही पिस्तुल खरेदी करण्यासाठी तीन इसम येणार होते . मात्र ते पसार झाले आहेत . पोलीस त्यांच्या मागावर आहेत .

यावेळी संशयिताच्या ताब्यातून 50 हजार रुपये किमतीचे पिस्तूल , दोन जिवंत काडतुसे , एक मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी एका संशयितासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . ही कामगिरी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर , पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर , पोलीस कर्मचारी कैलास खार्डे , दीपक हिवाळे , अरविंद वर्गने , दामोदर पवार , सोपान क्षीरसागर , समाधान तेलंग्रे , योगेश पठाडे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!