धारधार शस्ञ बाळगणारा एका युवकास अटक,सदर बाजार जालना पोलीसांची कामगीरी
जालना : प्रतिनिधी
दि. 25 आगस्ट रोजी पोलीस निरीक्षक रमेश रुपेकर, यांना मिळालेल्या माहीती प्रमाणे शुभम दिंगबर काळे रा.किर्तापुर हा गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी भोकरदन नाका परीसरात येणार आहे अशी बातमी मिळाले वरुन रुपेकर यांनी सदर माहीती पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांना कळवुन त्याचे सुचना व आदेशाप्रमाणे सापळा लावुन आरोपी शुभम दिंगबर काळे रा.किर्तापुर ता. मंठा जि. जालना यास ताब्यात घेऊन त्याचे कडुन गावठी पिस्टल जप्त केली होती सदर आरोपीकडे तपास केला असता त्याने त्याचे ईतर तिन साथीदार असल्या बाबत माहीती पोलीसाना दिली होती . त्या प्रमाणे पोलीस तपास करत असताना आज रोजी वरील गुन्हयातील आरोपी हा जालना शहरात फिरत आहे अशी पुन्हा माहीती पोलीस उप निरीक्षक रमेश रुपेकर यांना मिळाले वरुन त्यांनी पुन्हा आज रोजी कांबळे गलली संभाजी नगर जालना येथे सापळा लावुन सदर आरोपीस त्याचे ताब्यातील स्कुटी क्रमांक एम एच 21 बी ई 3938 सह ताब्यात घेऊन त्याचे कडे चौकशी केली असता त्याचे कडे स्कुटीचे डिग्गी मध्ये एक धारधार खंजर व एक गुप्ती असे 33500/- रुपयेचा ऐवज मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुध्द नव्याने भारतीय हत्यार कायदा प्रमाणे पोलीसानी गुन्हा नोंद केलेला आहे.
सध्या कालावधी मध्ये महत्वाचे सण उत्वस साजरे होणार असल्याने पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांच्या आदेशाअन्वये समाज कंठक व गुन्हेगारा विरुध्द विशेष मोहीम या पुढे राबवीण्यात येणार असल्याचे या वेळी पोलीसानी सांगुन अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या वेळी पोलीसानी सांगीतले आहे.
सदरची कामगीरी ही विनायक देशमुख, पोलीस अधिक्षक, जालना, विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक, सुनिल पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी, जालना यांचे मार्गदर्शना खाली, अनिरुध्द नांदेडकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सदर बाजार जालना, रमेश रुपेकर, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार, कैलास खार्डे, अमोल हिवाळे, समाधान तेलंग्रे, महादु पवार, राजु वाघमारे, सोपान क्षिरसागर, योगेश पठाडे, महीला पोलीस अंमलदार सुमीत्रा अंभोरे यांनी पाडली आहे.