मराठावाडा

खडकपूर्णा प्रकल्पात इतके टक्के पाणीसाठा:नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन

खडकपूर्णा प्रकल्पात 80 टक्के पाणीसाठा
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

images (60)
images (60)


जालना दि.1 – खडकपूर्णा प्रकल्प 80 टक्के पाण्याने भरला असून पाण्याची  आवक पाहता कुठल्याही क्षणी प्रकल्पाची द्वारे उघडण्याची परिस्थिती  उद्भवू शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


   नदीकाठच्या नागरिकांनी चालमालमत्ता, चीजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी,शेती अवजारे आदी सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करत  सर्व संबंधित  यंत्रणांनी धरणाच्या खालील व नदीकाठावरील नागरी भागामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत व या इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात घेता जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे निर्देशही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी माहिती दिली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!