ब्रेकिंग बातम्यामराठावाडा

अबब….पुराच्या पाण्यात बस गेली वाहून

images (60)
images (60)

मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथील घटना

मानवत/प्रतिनिधी

पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथे पहाटे चारच्या सुमारास घडली. वझुर गावात पाथरी आगाराची बस मुक्कामी होती. बस मध्ये चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते. बस मध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु बसला चालू होऊन ब्रेकच्या हवेची टाकी भरण्यास वेळ लागला. तोपर्यन्त एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बसने जागा सोडून वाहू लागली. प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी वाहनातून काढता पाय घेतला व जीव वाचवला. ते बसमधून बाहेर पडले आणि बस 100 मीटर पेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली….‌( गोदातीर समाचार)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!