मनोरंजन

बिग बॉस ओटीटी :सनी लिओनी दिलेला टास्क पाहून नेटकरी चांगलेच संतापले

मुंबई– ‘बिग बॉस ओटीटी’ ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे आणि बिग बॉसकडून देण्यात येणाऱ्या टास्कमुळे ‘बिग बॉस ओटीटी’ सोशल मीडियावर चर्चेत असतो. कार्यक्रमात जोडीने राहण्याच्या नियमामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली आहे. नुकतीच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये हजेरी लावली होती. सनीच्या येण्याने सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला. परंतु, सनीने स्पर्धकांना दिलेला टास्क पाहून नेटकऱ्यांनी कार्यक्रमावर टीका केली.

images (60)
images (60)

हा दिला टास्क

सनी ही बॉलिवूडमधील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या सनीने स्पर्धकांना एक आगळा वेगळा खेळ खेळायला दिला. जो पाहून स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही लाज वाटू लागली. सनीने टास्क म्हणून प्रत्येक जोडीला एक नारळ दिला आणि तो नारळ स्पर्धकांना आपापल्या जोडीदाराच्या मदतीने कमरेपासून वर तोंडापर्यंत आणायचा होता. यात त्यांना हातांची मदत घेता येणार नव्हती. स्पर्धकांनी खेळ तर पूर्ण केला परंतु, तो करताना स्पर्धकांच्या होणाऱ्या हालचाली पाहून प्रेक्षकांचा राग अनावर झाला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!