घनसावंगी तालुका

दिव्यांगाना लागणाऱ्या वय प्रमाण पत्राची अट शिथिल करा-प्रहार संघटनेची मागणी


घनसावंगी: दिव्यांगाना लागणाऱ्या वयाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात यावी यासाठी आज तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध म्हस्के,विष्णू मिठे,अंगद नागरे,मोईन कुरेशी,परमेश्वर जाधव, महादेव शिंदे,सचिन पवार आदी दिसत आहे.

images (60)
images (60)

घनसावंगी तालुका प्रतिनिधी/ नितीनराजे तौर

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगाना वय प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी हेळसांड होत असल्याने हि अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने आज दि.3 शुक्रवार रोजी घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घनसावंगी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या विभागाअंतर्गत दिव्यांगाना पगार सुरू केला जातो. यासंबंधी प्रस्ताव दाखल करताना तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना घनसावंगी येथील सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे वयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र घेताना दिव्यांग व्यक्तींना खूप अडचणी येत असतात. असे काही दिव्यांग लोक आहेत की त्यांना चालता , फिरता येत नाही,उठता बसता येत नाही. हे लोक वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे येऊ शकत नव्हते. आणि वैद्यकीय अधिकारी लाभार्थी समोर असेल तरच वयाचे प्रमाणपत्र द्यायचे . इतर कुटुंबातील व्यक्तीजवळ देत नव्हते. आणि मग बरेच दिव्यांग लोक ह्या योजने पासून वंचीत राहायचे. म्हणून दिव्यांगाची ही अडचण दूर करण्यासाठी प्रहार संघटना घनसावंगी जिल्हा जालना च्या वतीने घनसावंगी तहसील चे तहसीलदार श्री. नरेंद्र देशमुख यांना याबाबत निवेदन देऊन दिव्यांगासाठी वयाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रहार संघटनेचे जालना जिल्हा उपाध्यक्ष अनिरुध्द म्हस्के , घनसावंगी तालुका अध्यक्ष विष्णू मीठे , उपतालुका अध्यक्ष अंगद नागरे,कार्यध्यक्ष महादेव शिंदे, दिव्यांग नेते मोईन कुरेशी , परमेश्वर जाधव,सचिन पवार , आदींच्या स्वाक्षऱ्या होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!