घनसावंगी तालुका

विरेगव्हाण तांडा येथील ग्रामसभेत गोंधळ :

कुंभारपिंपळगाव :विरेगव्हाण तांडा (ता.घनसावंगी) येथे ग्रामसभेत बोलताना ग्रामसेवक के.ए.शहाणे व इतर.

images (60)
images (60)

रस्ते,घरकुल व अस्वच्छतेचा मुद्दा गाजला

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी /कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील ग्रामपंचायतिची ग्रामसभा शनिवारी (ता.४) रोजी आयोजित गोंधळात पार पडली.
कोरोना काळात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात येत नव्हत्या, मात्र आता सध्या कोरोना चा कहर काहीसा कमी झाल्याने ग्रामसभा घेण्यास सुरुवात झाली आहे.यातच शनिवारी विरेगव्हान तांडा(ता.घनसावंगी) येथील ग्रामसभेत रस्ते,घरकुल, शौचालय अनुदान व घाणीचे साम्राज्य या मुद्द्यांवरून चांगलीच खडागंजी झाल्याचे दिसून आले.ही ग्रामसभा सरपंच सागरबाई तुकाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली दरम्यान ग्रामसभेत मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड करणे,नाला रूंदीकरण,गाळ काढणे,पाणंद रस्ता,सिंचन विहिर आदी विषयांवर चर्चा झाली.
दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामसेवक के.ए.शहाणे यांना घरकुल,शौचालय, नाली,रस्ता अशा विविध समस्यांवर ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले.
यावेळी सरपंच सागरबाई पवार, उपसरपंच, विमल पवार,तुकाराम पवार, वसंत पवार, विलास पवार, शिवाजी राठोड,विष्णू राठोड,जालिंदर पवार साहेबराव राठोड, सोपान राठोड,वामन राठोड, आबासाहेब चव्हाण, सुनील राठोड,विकास राठोड, विनोद पवार, गोवर्धन पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!