घनसावंगी तालुका

जांबसमर्थ येथील पर्यायी पुलावरून वाहते पाणी; वाहनधारकांकडून जीवघेणा प्रवास

कुंभारपिंपळगाव:अंबड-पाथरी राज्य रस्त्यावरील बनाची नदी तुडुंब भरून वाहत आहे.वाहनधारक,ग्रामस्थ,शेतकरी मात्र आपला जीव धोक्यात घालुन या पुलावरून जीवघेणा प्रवास करीत आहे.

images (60)
images (60)

कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह परीसरात शनिवार दि.(४) मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.त्यामुळे या परीसरातील नदी-नाले,लघु साठवण तलाव,विहीर तुडूंब भरून वाहत आहे.अंबड-पाथरी राज्य रस्त्यावरील बनाच्या नदीवरील पर्यायी पुलावरून पाणी वाहत आहे.मात्र शेतकरी,ग्रामस्थ,वाहनधारक, प्रवाशी या पुलावरून जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे.प्रतिवर्षी या नदीला पुर येत असल्याने वाहतूक वारंवार ठप्प होत आहे.त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.या पुलाचे काम मागील दिड वर्षांपासून संथगतीने सुरू असून अद्यापही हा पुल अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची ये-जा दिवस रात्र नेहमी सुरूच असते.अंधारात या रस्त्यावरून प्रवास करताना पर्यायी पुलावरून जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.वरीष्ठाने याकडे लक्ष देउन सदरील पुलाचे काम तातडीने करावेत अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!