भोकरदन तालुका

जनावरे चोरणाऱ्या टोळीचा तपास लावा , महेश पुरोहित यांची अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन शहरासह परिसरातून गेल्या काही दिवसांपासून शेकडो जनावरे चोरीला गेली असून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा लवकरात लवकर तपास लावून त्यांच्यावर कडक कार्यवाही करा नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मागील काही महिन्यांपासून भोकरदन शहरासह तालुक्यातून शेकडो जनावरे चोरीला गेली असून त्या चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर अध्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसून दोन दिवस आड भोकरदन शहर व परिसरातून आठ ते दहा जनावरे चोरीस जात असल्याचे म्हटले असून यामध्ये प्रामुख्याने बैलजोडी सह गाईंचे प्रमाण जास्त असून या जनावरे चोरणाऱ्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा असे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष ऍड. हर्षकुमार जाधव , मराठवाडा अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष शेख नजीर शिवसेना शहरप्रमुख भुषण शर्मा , युवासेना उपजिल्हाअध्यक्ष सुरेश तळेकर उपस्थित होते. यावेळी संबंधित गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कडक कायदा करून त्यांना शिक्षा द्यावी व पशुपालकांना न्याय मिळवून द्यावा नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनाची छायांकित प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील पाठवण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!