मनोरंजन

जालन्यातील जीवन ठोसर पोहचला कोण होणार करोडपती मध्ये


सोमवार, मंगळवार होणार प्रसारण
न्यूज जालना | जालना 

images (60)
images (60)


सध्या सोनी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या कोण होणार करोडपती या प्रश्नमंजूषा मालिकेत जालना शहरातील रहिवासी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक जीवन ठोसर यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण १३ व १४ सप्टेबर या दोन दिवशी रात्री नऊ वाजता होणार आहे. या मालिकेचे सुत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले आहे.

अशा प्रकारच्या प्रश्नमंजूषा मालिकेत सहभागी होणारे ते जिल्ह्यातील पहिलेच व्यक्ती आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, जीवन ठोसर यांनी सांगितले, एकूण सहा लाख स्पर्धकांमध्ये स्पर्धा होऊन माझी निवड झाली. तसे पाहिले तर ती स्पर्धा अतिशय कठीण परंतु तेवढेच उत्साहवर्धक आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेली परिस्थिती सर्व जाणतातच.

त्या वेदनादायी परिस्थितीत बुद्धिमत्ता असलेल्या सर्वसामान्यांना या कार्यक्रमातून आधार मिळतोय. कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य ‘ज्ञानाची साथ’ असं आहे.  ते केवळ पुस्तकी ज्ञान हवं असं नाही. मी माझे नेमून दिलेले शासकीय कामकाज सांभाळत या कार्यक्रमासाठीची तयारी केली. १ ते ४० एपिसोड मध्ये सर्वाधिक जलद गतीने आणि अचूक प्रश्नांची उत्तरे देऊन सोनीलिव या ॲप मधून प्ले अलोंगच्या माध्यमातून माझी निवड झालेली आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचे ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकते. ज्ञान तुम्हांला कधीही उपयोगी पडू शकते आणि हीच तुमची खरी ताकद आहे. असे ठोसर म्हणाले. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!