भोकरदन तालुका

भायडी तळणी विरेगाव ग्रुप ग्रामपंचातच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे फाॅर्मचे वितरण

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील भायडी तळणी विरेगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कार्यालय भायडी येथे जिल्हा परिषद सदस्य मनीषा गजानन जंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी रोजगार हमी योजना समृद्धी बजेट 2021- 22 चे फॉर्मचे वितरण ग्रामस्थांना करण्यात आले.

‌MRGES समृद्धी बजेट मध्ये महाराष्ट्र सरकारने 262 योजना सर्व ग्रामस्थांना आपल्या शेतीच्या बाबती मधील अडीअडचणी सोडविण्यासाठी विविध योजना या समृद्धी बजेट च्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत भायडी येते आज शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी प्रथम नागरिक रेखा केशव जंजाळ सरपंच उपसरपंच गंगा गणपत दसपुते ग्रामपंचायत सदस्य अरुण बोर्डे सांडु निकाळजे सुनिता सोनवणे शिवाजी जंजाळ माजी सरपंच नानासाहेब रंगनाथराव जंजाळ माजी सदस्य विष्णू काळे आनंदराव दसपुते हरिभाऊ काळे लोकजागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष केशव जंजाळ व ग्रामसेवक गजानन तायडे, उत्तमराव जंजाळ, मार्तंड गावंडे ,विष्णू जंजाळ, देविदास निकाळजे ,लक्ष्मण जंजाळ, मिराबाई खंडागळे, व रामदासजी दसपुते, मुकुंदा गवांडे, अर्जुन वसाने, हरिदास जंजाळ, ठकुबाई काळे, गावातील बरेचशे ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केशव जंजाळ यांनी ग्रामस्थांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेबाबत समृद्धी बजेट काय आहे कोण कोणत्या योजना आहेत याची माहिती सर्व ग्रामस्थांना दिली सोबतच ग्रामसेवक गजानन तायडे यांनी सुद्धा याबाबत मार्गदर्शन करताना भायडी तळणी विरेगाव या तिन्ही गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत जाऊन सर्वांच्या फॉर्म भरून घेतले जाणार आहेत व नंतर हे सर्व अर्ज पंचायत समिती भोकरदन ला सादर करणार आहोत शासनाकडे सादर करणार आहोत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामसेवक तायडे साहेब यांनी केले आहे सरपंच रेखाताई जंजाळ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपला म्हणून जाहीर केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!