मनोरंजन

बिग बॉस मराठी -३ सिजन मध्ये हे असू शकतात स्पर्धक ?

मुंबई– छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच कार्यक्रमाचे काही प्रोमो वाहिनीकडून प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रोमो पाहून प्रेक्षक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ १९ सप्टेंबरपासून रात्री ९. ३० वाजता प्रसारित होणार आहे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकाच घरात तब्बल ९० दिवस राहण्यासाठी येतात.

images (60)
images (60)


काहींची एकमेकांसोबत गट्टी जमते तर काही एकमेकांचे कट्टर वैरी होतात. ९० दिवस कार्यक्रमात टिकून राहण्याचं आव्हान सहभागी होणाऱ्या प्रयेक कलाकारासमोर असतं. त्यातही बिग बॉसची आज्ञा पाळत त्यांनी दिलेले टास्क इमाने इतबारे पूर्ण करत स्वतःला सिद्ध करून दाखवायची चुरस या सगळ्याच सदस्यांमध्ये असते


कलर्स मराठी वाहिनीवरील सगळ्यात जास्त लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून प्रेक्षक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


यावेळेस कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक कसा खेळ खेळणार हे लवकरच कळेल. ‘बिग बॉस मराठी’ सीजन तीनमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. ही आहेत खेळात सहभागी होणाऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची नावं.
हे असू शकतात

यांची नावे आहेत रेसमध्ये


आनंद इंगळे,कमलाकर सातपुते,अंशुमन विचारे, प्रणित हाटे,पल्लवी पाटील, नेहा जोशी,पल्लवी सुभाष,भाग्यश्री लिमये,नक्षत्रा मेढेकर, खुशबू तावडे,अक्षया देवधर, रुपल नंद, संग्राम समेळ, सुयश टिळक,चिन्मय उदगीरकर

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!