राज्य उत्पादन शुल्क विभागाची जालना शहरात चार ठिकाणी कारवाई
जालना दि. 17 :- राज्य उत्पादन शुल्क जालना व निरीक्षक उत्पादन शुल्क अंबड या कार्यालयाने एकत्रित केलेल्या कारवाईत दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी कैकाडी मोहलला जुना जालना भागात केलेल्या कारवाईत एकुण 4 गुन्हे नोंदविले असुन एकुण 1 लाख 10 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत गावठी हातभट्टीमध्ये दारु 80 लिटर व गुळमिश्रीत रयासन 4 हजार 240 लिटर जागेवरच जप्त करण्यात आला.
यावेळी आयुकत् कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, संचालिका श्रीमती उषा आर.वर्मा, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जालना पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखली कारवाई करतेवळी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक जालना, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबड तसेच अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क जालना पराग नवलकर, निरक्षक सु.अ.गायकवाड,निरीक्षक एम.एन. झेंडे, निरीक्षक आर.एन. रोकडे,दुय्यम निरीक्षक बि.एस. पडुळ,दु.नि. ए.ए. औटे, दु.नि. ए.ए. महेंद्रकर, दु.नि. पी.बी टकले, दु.नि. एम.एस. पठाण, जवान सर्वश्री राठोड,पल्लेवाड, बिजुले, कांबळे, पवार, अंभोरे, डहाळे, आडेप, गुणावत व महिला जवान श्रीमती आर.आर. पंडीत आदी उपस्थिती होते.
जालना जिल्ह्यातील नागरीकांना आपल्या गावातील परीसरामध्ये दारु निर्मिती,वाहतुक, विक्री तसेच अवैधरीत्या मळी,मद्य, मद्यार्क बाळगणे, वाहतुक करणे किंवा विक्री करणा-या इसमांची माहिती संपर्क क्रमांक02482-225478 व व्हाटस्सॲप क्रमांक 8422001133 टोल फ्री क्रमांक1800833333 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन दुय्यम निरीक्षकराज्य उत्पादन शुल्क जालना यांनी केले आहे