घनसावंगी तालुका

खासदार संजय जाधव यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

images (60)
images (60)

परतूर / प्रतिनिधी

वाहेगाव सोपारा ता.परतूर येथील दत्ता मच्छिंद्र काटे (वय ४०) या शेतकऱ्यांने बुधवारी शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. काटे कुटुंबियांची परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी आज दि.18 शनिवार रोजी भेट देऊन त्यांचे सात्वंन केले. या कुटुंबाला 51 हजार रूपयांची आर्थिक मदतही केली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे,बाबासाहेब तेलगड,माधव कदम,अशोक आघाव,संतोष वरकड, दायमा सेठ,मधुकर खरात,विठ्ठल वटाणे,महेश नळगे,अमोल सुरूंग,भारत भुसारे,नितीन राठोड,स्वीय सहाय्यक अंगद अंभूरे रामजी खवल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!