घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात गणेश विसर्जनानिमित्त तुकाराम महाराज पालखी दिंडी प्रदक्षिणा

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

कुंभार पिंपळगाव येथील विठ्ठल गणेश मंडळाच्या वतीने आज दि.(१९) रविवार रोजी कोरोना नियमांचे पालन करून गणेश विसर्जना निमित्त जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली.येथील अंबड-पाथरी मुख्य रस्त्यावर चौकात ह. भ. प. अरूण महाराज देवरे यांचा सुरेख असा भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला.विठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून दिंडी प्रदक्षिणेला सुरूवात करण्यात आली.संपूर्ण गावात नगर प्रदक्षिणा घालून दिंडीचा समारोप करण्यात आला.

टाळ -मृदंगाच्या गजरात भजनांचे गायन करीत निघालेल्या या दिंडीत महिला पुरूष मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या.भगवे ध्वज हातात घेऊन भाविक भक्तिमय वातावरणात माऊली तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले.यावेळी गायनाचार्य,मृदंगाचार्य,विणेकरी,टाळकरी यांच्यासह गावातील महिला व पुरूष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!