परतूर तालुका

परतूर:तांबटकर गल्लीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी


दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शहरातील गाव विभागातील तांबटकर गल्लीतील (पंजेतन मोहल्ला) नळांना मागील वर्षभरापासून पाणीपुरवठा केला जात नाही त्यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. नगरपालिकेने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी गल्लीतील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी पालिकेच्या मुख्याधि-र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गाव विभागातील तांबटकर गल्लीतील २० ते २२ नागरिकांनी नगरपालिकेमार्फत रितसर नळ कनेक्शन घेतलेले आहे.मात्र कनेक्शन घेऊन वर्ष उलटले तरी देखील नळांना थेंबभरही पाणी येत नाही.नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांना व विशेष म्हणजे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नागरिकांनी यापूर्वी अनेकदा पाणी येत नसल्याबद्दल कळविले आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नळांना नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात अर्जुन पाडेवार यांच्यासह शेख गुलफाराज अकतर,गफार सौदागर, शेख,जाकेर शेख आक्तर,शेख सलीम,शेख, मोबीन शेख लाल, शेख ईसुब शेख लाल,शेख बाबा शेख चांद, शेख,नजीर शेख ईसनाईल,शेख अक्तर ,शेख निसार, शेख, ईनुस शेख,अनवर,शेख,जाफेर,या सह अनेकांच्या सह्या आहेत.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!