भोकरदन तालुका
खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचा पर्युषण पर्व उत्साहात साजरा
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन येथे खंडेलवाल दिगंबर जैन समाजाच्या पर्युषण पर्वाची दिनांक १० सप्टेंबर रोजी सुरुवात श्री १००८ शांतिनाथ खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे करण्यात आली. या वेळी सकाळी
प्रथम ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर नित्यनियमाने सलग १०
दिवस मुळनायक श्री शांतिनाथ भगवंताचे ढोल ताशांच्या गजरात पंचामृत अभिषेक, संगीतमय भजन व भक्तिमय पूजन अभूतपूर्व उत्साहाने करण्यात आले.यावेळी सकल खंडेलवाल जैन समाज
दररोज विविध सांस्कृतिक स्पर्धा तसेच संध्याकाळी भगवंताची आरती व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता भगवंताची ढोल पथकाच्या गजरात
मिरवणूक काढून अभिषेक करून करण्यातआली. या वेळी समस्त खंडेलवाल जैन समाज महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते