औरंगाबादमराठावाडा

ब्रेकिंग:जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पैठण : नाशिक जिल्ह्यात व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातून (Jayakwadi Dam) बुधवारी (ता.२९) गोदावरी नदी (Godavari River) पात्रात विसर्ग धरणाच्या सांडव्यातुन सुरु करण्यात आला आहे. धरणाच्या एकुण २७ पैकी १८ वक्र दरवाजांतून ९ हजार ४३२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. अर्धाफूटाने दरवाजे पाणी (Aurangabad) सोडण्यासाठी उघडण्यात आले आहे. सुरुवातीला पाच दरवाजेे उघडण्यात आले होते. दरम्यान, धरणात वरील भागातुन जवळपास एक लाख क्यूसेक पाणी येत असल्याने गोदाकाठच्या गावांना तालुका (Paithan) प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे यांनी सांगितले.

images (60)
images (60)

गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यापुर्वी नाथसागराला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देवुन विधिवत पाण्याचे जलपुजन केले. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता,विजय घोगरे, लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सबीनवार, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष पवन लोहिया, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण शाखा अभियंता बी. वाय अंधारे, तांत्रिक सहायक गणेश खराडकर, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी-ना.राजेश टोपे

दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना यांनी गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पालकमंत्री ना.राजेश टोपे म्हणाले, पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळुन गावकऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करत कुठलीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना सतर्क राहून त्याबाबतच्या उपाययोजना त्वरेने करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!