भोकरदन तालुका

जालन्यात घरफोडी करणारे दोन आरोपी भोकरदन येथे मुद्दमालासह अटक

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

दि. 30 सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे भोकरदन येथे प्रभारी अधिकारी सपोनि आर. बी. जोगदंड यांना समता नगर भोकरदन येथे दोन ईसम संशयीत रित्या फिरत असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी मिळालेल्या माहीती बाबत वरीष्ठांसोबत चर्चा करुन पोलीस ठाणेचे सपोनि आर. के. तडवी, पोना वायकोस, पोका जगताप यांना सदर ठिकाणी पाठवुन संशयीत रित्या फिरत असलेल्या दोन्ही ईसमांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेला आणले होते. दोन्ही ईसमांना त्यांचे नाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) शेख आमेर शख रमजानी रा. मिल्लत नगर जालना व 2) समीर सय्यद जावेद रा. माळी पुरा जालना असे असल्याचे सांगीतले. त्यावरुन पोलीसांनी त्यांना भोकरदन शहरात फिरत असले बाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. म्हणुन त्यांचे कडे असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्यांचे बॅग मध्ये रोख रक्कम दिसुन आल्याने त्यांना रोख रक्कमे बाबत विचारपुस केली असता त्याबाबत दोन्ही ईसमांना समाधान कारक उत्तरे देता आली नाही. म्हणुन सपोनि आर. के. तडवी यांनी पंचांना बोलावुन घेवुन दोन्ही ईसमांची झडती घेतली असता दोन्ही ईसमांकडे 5,89,190 रुपये रोख तसेच 3,77,609/- रुपयांचे सोन्या चांदीचे दागीने मिळुन आले. मिळुन आलेल्या माला बाबत दोन्ही ईसमां कडे विचारपुस करता त्यांनी समाधान कारक माहीती न दिल्याने त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागीने जालना येथुन एक घरातुन दिनांक 29 सप्टेंबर रोजी दिवसा घरफोडी करुन चोरी केले असल्याचे कबुल केले. त्याचप्रमाणे चोरी केल्यावर आम्ही औरंगाबाद येथे गेलो होतो व त्यानंतर रात्रीच्या वेळी भोकरदन येथे आलो असल्याचे पोलीसांनी कळवीले आहे. पोलीस ठाणे भोकरदन येथे मिळुन आलेल्या रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागीन्यांचे चोरी संदर्भाने पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल झालेला असुन मिळुन आलेले ईसम व त्यांचे ताब्यातील चोरीचा माल पोस्टे कदीम जालना येथे गुन्हयाचे पुढील तपासकामी दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सपोनि जोगदंड यांनी कळवीले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक विनायक देशमुख जालना, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे भोकरदन यांचे मार्गदर्शना खाली सपोनि आर. बी. जोगदंड, सपोनि आर. के. तडवी, पोउपनि कापुरे, पोना/वायकोस , भुतेकर, पोकॉ जगताप, निकम यांनी केली आहे. अटटल घरफोडी करणारे चोरटे चोरीचे मालासह जेरबंद झाल्याने परीसरात पोलीसांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!