रेणुका माता नवरात्र उत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरा करा-अनिरूद्ध शिंदे
कुंभार पिंपळगाव-कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथील रेणुका माता मंदीरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या देवस्थान समितीच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहे.तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती होणार आहे.दिनांक 13 रोजी पुर्णाहुती,होमहवन करण्यात येणार आहे. तसेच दि.15 रोजी सिमोल्लंघनच्या दिवशी पालखी मिरवणूक काढून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर समिती कडून करण्यात आले आहे.
‘कोरोना महामारीमुळे मागील दिड वर्षापासून मंदिर होते.यंदा शासनाच्या नियमानुसार नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पुर्णपणे व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे’.
अनिरूद्ध शिंदे
पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना गटनेते,घनसावंगी