जालना क्राईम

जालना:स्वतः तीन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटून केला खून!

मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील घटना

images (60)
images (60)

न्यूज जालना-मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील अविनाश लिंबा चव्हाण यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री दोन महिला शौचास बसल्या होत्या. त्यावेळी अविनाश याने आम्हाला वास येतो, येथे शौचास बसू नका असे बजावले होते.त्यानंतर या महिलांच्या घरातील लोक अविनाश याला जाब विचारण्यासाठी आले होते. त्यावेळी अविनाश याने जाब विचारणाऱ्यांना अद्दल घडवून, त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वतःच्या तीन महिन्याच्या स्नेहा नावाच्या मुलीला निर्दयीपणे  जमिनीवर आपटविले

गावातील नागरिकांनी तातडीने स्नेहा हिस मंठा ग्रामीण रुग्णालयात हलविले, मात्र डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला होता.

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.सदर ची कारवाई  परतूर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राजू मोरे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक असमान शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस अंमलदार गायके, प्रशांत काळे, दीपक आढे, पोलीस अंमलदार आढे, खरात, मांगीलाल राठोड, राजू राठोड आदींनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!