भोकरदन तालुका
आईची रक्षा शेतात टाकुण लावली झाडे,जंजाळ परिवाराचा उपक्रम
मधुकर सहाने : भोकरदन
कै.गयाबाई तेजराव पाटील जंजाळ यांचे नुकतेच निधन झाले.त्याचां रक्षाविधी विर्सजनाचा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी त्यांच्या परिवारातील सदस्यांनी रक्षाविधी कार्यक्रम बाहेर गावी न करता.शेतातच रक्षा पुरुन त्या ठिकाणी अंबा,जांभुळ,सिताफळ,कडुलिंब व पेरुची झाडे लावण्यात आली.
अशा महत्त्व पुर्ण झाडांची लागवड करुन समाजापुढे एक आर्दश निर्माण केला आहे.
समाजातील काही प्रथा परंपरा बाजूला ठेवुन नवीन आदर्श निर्माण करणे काळाची गरज बनली असुन.जंजाळ परिवाराने आईच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करुन व संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.परिसरात त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.