घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात;दुचाकीस्वार गंभीर जखमी

कुंभारपिंपळगाव:अंबड पाथरी राज्यमार्गावरील विरेगव्हाण तांडा जवळील अपघातग्रस्त चारचाकी वाहन.

images (60)
images (60)

अंबड पाथरी राज्यमार्गावर विरेगव्हाण तांडा जवळील घटना

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

अंबड पाथरी राज्यमहामार्गावरील विरेगव्हाण तांडा जवळ चारचाकी व दुचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक झाल्याची घटना (दि.३१) रविवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.जांबसमर्थहून एक दुचाकीस्वार कुंभार पिंपळगावाकडे कामानिमित्त येत होते.चारचाकी व दुचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली.यात जांबसमर्थ(ता घनसावंगी) येथील दुचाकीस्वार चालक व महिला गंभीर जखमी झाले आहे.दुचाकी वरील महिलेला पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कुंभार पिंपळगाव येथील पोलीस चौकीचे पोलीस उपनिरिक्षक दिपक डोलारे,पोलीस नाईक रामदास केंद्रे,हरिश्चंद्र,यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार,गणेश पवार, अशोक जाधव,अनवर पठाण,प्रकाश तांगडे भागवत तांगडे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव  घेतली.परंतु पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!