कुंभार पिंपळगावात दिवाळीच्या खरेदीसाठी उसळली गर्दी

कुंभारपिंपळगाव:दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची साहित्यांनी सजलेली दुकान.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
दिवाळीचा सण अगदी चार दिवसांवर आल्याने कुंभार पिंपळगाव बाजारपेठेत गावासह परीसरातील ग्रामस्थ साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.कोरोना महामारीत ठप्प झालेले आर्थिक जनजीवन पूर्वपदावर येत आहे.या पाश्र्वभूमीवर नागरीक खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला दुतर्फा मार्गावर विविध साहित्याची दुकाने सजलेली आहेत.प्रकाशाचा सण मानला जाणाऱ्या दिवाळी सणाला प्रकाश दिव्यांना अधिक महत्त्व दिले जाते.विजेचा झगमगाट असला तरी घर आणि अंगणात पणत्या पेटविण्याची परंपरा कायम आहे.त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विविध आकारातील पणत्या,आकाशकंदील,टांगते दिवे,छोटे नंदादीप विक्रीसाठी आले आहेत.त्याचबरोबर कापड,किराणा,कटलरी,फरसाण,यासह बांगड्या,पुजेचे साहित्य,रोजमेळ वह्या,दिवे,लाइटिंग,झाडू,फडे,लक्ष्मीची मुर्ती,फोटो,रांगोळी आदींची दुकाने गजबजलेली आहे.फटाके खरेदीसाठी दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे.विविध दुकानदारांनी आकर्षक सजावट करून साहित्य ठेवलेली आहेत.