कुंभार पिंपळगाव येथील दत्तात्रय कंटुले उत्कृष्ट व्यापारी पुरस्काराने सन्मानित
कुंभारपिंपळगाव:जालना येथे आज व्यापारी महासंघाच्या वतीने उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार दत्तात्रय कंटुले यांना पुरस्कार प्रदान करताना आमदार कैलास गोरट्यांल व इतर.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय शेषेराव कंटुले यांना आज (दि.७) रविवार रोजी व्यापारी महासंघ जालना यांच्या वतीने जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्याहस्ते उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.दिपावली स्नेहमिलन,कोविड योद्धा व उत्कृष्ट व्यापारी म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी जालना जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब,सतिष पंच,सिताबाई मोहिते,जगनराव थोटे,नरेंद्र जोगड,विजय कंटुले यांच्यासह आदी जण उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल येथील व्यापारी महासंघाच्या वतीने श्री.कंटुले यांचा सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.