मानव देहाचा मन सुंदर असला पाहिजे-ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
मानव देहाचा मन सुंदर असला तर जगात कोणतीही गोष्ट साध्य होत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केले. ते आज कुंभार पिंपळगाव येथील आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात निरूपण करताना सांगितले.तिसऱ्या दिवसीच्या किर्तन सेवेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात पुष्प गुंफताना ह.भ.प.तांबे महाराज म्हणाले की,संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अलंकारांनी नटलेली स्रीचे सौंदर्य दिसणे स्वाभाविकच आहे.प्रत्येक संताची भाषा शैली वेगवेगळी आहे.संत एकनाथ महाराजांची क्रती संत ज्ञानेश्वर महाराजापेक्षा वेगळी आहे.विस्तार करून पसरविण्याची क्रती संताची आहे.संसार हा व्रषाचा रूपक आहे.शरीराचा मन सुंदर असला पाहीजे.संत ज्ञानेश्वर माऊलींनी निसर्गाचा वर्णन हे एका वेलीत केला आहे.माऊलींनी मोगऱ्या वेलींचा वर्णन केले आहे.या अभंगाचा सामर्थ्य महाराजांनी अभंगातून व्वक्त केले आहे.वैचारिक वाड;मयात सर्वांनी शास्रशुद्ध विचार केला पाहिजे.अधिव्याप्ती वाढविली तर मनात दोष निर्माण होतो.शब्दाला चढ उतार देणे यालाच संत ज्ञानेश्वरांनी क्लेश असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले आहे.वारकरी सांप्रादायाचे जगभरात खुप मोठा विस्तार झालेला आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा वेणू गेला गगनावरी असे संबोधले आहे.सांप्रादायाच्या विस्ताराला रोप लावलेला आहे.वारकरी सांप्रादायालाच मोगरा वेलींची उपमा दिलेली आहे.वेलींचा रोप शरीरात प्राप्त केल्यास खरा परमार्थ सार्थ ठरेल.भगवतांचा सगुण रूप धारण केले पाहिजे.ज्यांच्याकडे भगवंताचा ज्ञान असतो.त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो.मोक्षाला अंत नसतो.परमार्थाचा ज्ञान वाढतच राहतो.परमार्थ हा मनाचा केला पाहिजे.प्राप्त गोष्टींचा अहंकार बाळगू नये.मनात अहंकार निर्माण झाल्यास परमार्थ वाया जातो.आज समाजात एकमेकांबद्दल द्वेष,मत्सर,राग,वाढत चाललेला आहे.परंतु द्वेष करण्यापेक्षा प्रेम करा बदला घेण्यापेक्षा स्व:तात बदल करण्याचे महारांजांनी सांगितले.तरूण पिढी दारूच्या व्यसनी लागला आहे. सकाळी चहाच्या अगोदर दारू पित आहेत.त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.ज्या घरात आई वडील हसत असतात त्या सुख सम्रद्धी नांदत असल्याचे महारांजांनी किर्तनातून सांगितले.या किर्तनासाठी परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.