जोगेश्वरी ॲग्रो प्रो,क.लि.मधुरम गुळ उद्योगाचा दुसरा गळित हंगाम चा शुभारंभ कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या हस्ते संपन्न
शिवणगाव भादली रोडवरील कर्मयोगी हंसराव नगर उक्कडगाव येथील जोगेश्वरी गुळ उद्योगामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा : विजय अण्णा बोराडे
सातत्यपूर्ण जोगेश्वरी ॲग्रो प्रो क मधुरम गुळ उद्योग सुरु ठेऊन शेतकऱ्यांना मदत करणार : कल्याणराव तौर ठाकुर
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर
जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील शिवनगाव भादली रोड कर्मयोगी हंसराव नगर उक्कडगाव येथे जोगेश्वरी आग्रो प्रो क लि.मधुरम गुळ उद्योगाचा दुसरा गळित हंगाम चा शुभारंभ कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मा विजय अण्णा बोराडे, मराठवाडा, भगवानराव काळे, कल्याणराव तौर ठाकूर, रघुनाथ तौर, सह विविध मान्यवर शेतकरी बांधव उपस्थित होते
सविस्तर असे की जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील शिवनगाव भादली रोड कर्मयोगी हंसराव नगर उक्कडगाव येथे शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न गंभीर होत असल्याने गेल्या वर्षी या ठिकाणी जोगेश्वरी ॲग्रो प्रो क. लि.मधुरम गुळ उद्योग सुरू करण्यात आला असून गुळ उद्योगाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने मधुरम गुळ उद्योगाचा या वर्षी दुसरा गळीत हंगामा चा शुभारंभ दि 12/11/2021 रोजी दु 1 वा उदघाटक कार्यसम्राट आमदार अँड मा लक्ष्मण अण्णा पवार गेवराई विधानसभा हस्ते करण्यात आला यावेळी सत्कारमुर्ती विजय अण्णा बोराडे मराठवाडा कृषि भुषन , तसेच प्रमुख पाहुणे मा भगवानराव काळे कारला कृषी भुषन , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा कल्याणराव हंसराव तौर ठाकुर अध्यक्ष जोगेश्वरी आग्रो प्रो क.लि, मा सभापती रघुनाथ तौर,मा शैलराजे भैय्या तौर, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया, शंकरराव खोजे मा सरपंच,शैलद्रजी देशमुख, शिवव्याख्याते भगवानराव तौर, पोकळे,काका, गणेश खेडेकर, राजेंद्र तौर प्रगतशील शेतकरी, पत्रकार नितीन तौर, सुदर्शन राऊत,चिमनाथ वाळेकर, उपस्थित होते बोलताना कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी जोगेश्वरी ॲग्रो प्रो क मधुरम गुळ उद्योजक शैलराजे भैय्यासाहेब तौर यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले,या मधुरम गुळ उद्योगामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी फायदा होईल ,व जोगेश्वरी ॲग्रो च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शैलराजे भैय्यासाहेब तौर यांनी काम करावे असे ही आ पवार म्हणाले,मा विजय अण्णा बोराडे, भगवानराव काळे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले मा कल्याणराव तौर ठाकूर अध्यक्ष जोगेश्वरी आग्रो प्रो क, यांनी सविस्तर मनोगत व्यक्त करत मधुरम गुळ उद्योग शेतकर्याना योग्य भाव देऊन सर्वांचा उस वेळेवर घालण्यासाठी पर्यंत करु,या भागातील शेतकर्याना नेहमीच मदत करुन उत्पादन वाढवण्यासाठी शेतकर्याना मार्गदर्शन करणार, जोगेश्वरी ॲग्रो,मधुरम गुळ उद्योग सातत्याने गाळप सुरु ठेवुन शेतकर्याचे हित जपेल असे ही मा कल्याणराव तौर ठाकुर यांनी सांगितले सुत्रसंचलन भुतेकर यांनी तर आभार भाजपा ता अध्यक्ष संजय दादा तौर यांनी मानले ,ईतीहास तज्ञ सतिश सोळुंके, काकासाहेब चव्हाण,आर डी भिकारी, आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाधर कापसे, परमेश्वर तौर, सोमनाथ वाळेकर, रामभाऊ तौर, दत्ता भाऊ तौर, राहुल तौर, रामेश्वर तौर, महादेव मोरे, यांनी परिश्रम घेतले यावेळी गाळपासाठी राजेंद्र तौर यांचा ऊस आणण्यात आला होता.