कुंभार पिंपळगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
कुंभारपिंपळगाव:येथे सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता आज शनिवार रोजी ह.भ.प.त्रंबक महाराज दस्तापुरकर यांच्या काल्याचे किर्तनाने झाली.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मागील सात दिवसांपासून सुरू असलेला अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता आज (दि.१३) शनिवार रोजी ह.भ.प.त्रंबक महाराज दस्तापुरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.काल्याच्या किर्तनात ह.भ.प.दस्तापुरकर महाराज यांनी जगदगुरू वैकुंठवाशी संत तुकाराम महाराज यांच्या
गोकुळीच्या सुखा ! अंत पार नाही लेखा! बाळकृष्णा नंदा घरीं!आनंदल्या नरनारी !! गुढीया तोरणें ! करीती कथा गाती गाणें !! तुका म्हणे छंदे ! येणे वेधिले गोविंदे !!
या चार चरणाच्या अभंगावर निरूपण करताना महाराजांनी गोकुळात असलेला सुखाचा वर्णन विस्तृतपणे मांडले.भक्तांच्या घरी सगुण प्रकट करून नंदकाच्या घरी बाळकृष्ण जन्माले आले म्हणून सर्व गोकुळवासींना सुख प्राप्त झाले.म्हणून याला अंतपार राहिले नाही.परमार्थ स्वत:नंदकाच्या घरी सुख घेवून आले.गोकुळ नगरीत सर्वत्र गुढी उभारून कथा गायन करून लागले.गोंविदाने गोकुळातील सर्व लोकांना छंद लावले.धन आणि मान या दोन गोष्टी देवाकडे चालत नाही.सुख मिळवायचे असेल तर भगवंताचे चिंतन करा.असे महाराजांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी खासदार संजय जाधव,स्वीय सहाय्यक अंगद अंभुरे,यांच्यासह कुंभार पिंपळगावसह परीसरातील महिला,पुरूष, गायक,वादक,गुणीजन भजनी मंडळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.