जालना जिल्हा

जुना जालना येथील गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा,पावणेसात लाख रुपयांचे माल नष्ट

images (60)
images (60)

न्यूज जालना(ब्यूरो)

जुना जालन्यातील नुतन वसाहत, कैकाडी मोहल्ला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी दि.17 नोव्हेंबर रोजी अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला.या कारवाईत 6 लाख 26 हजार रूपयांचे दारू व रसायन नष्ट केले.
जुन्या जालन्यातील नुतन वसाहत, कैकाडी मोहल्ला येथे अवैध रित्या गावठी दारू निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने भल्या पहाटे मोठ्या फौजवाट्यासह अचानक छापा मारला.या छाप्यात पावणेसात लाख रूपयांचे गावठी दारू व रसायन नष्ट केले.सदरील कारवाईत पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले,दुर्गेश राजपूत, यांच्यासह कर्मचारी सहभागी होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!