लक्ष्मी स्टील दुकान फोडणारा आरोपी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगदी मुद्देमालासह 03 तलवारी व 01 खंजीर जप्त
जालना/प्रतिनिधी
जुना मोंढा भागातील लक्ष्मी स्टील हे दुकान दि.17 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी दुकान फोडुन नगदी पैसे चोरुन नेले होते.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासुन गुन्हया संबंधाने विश्लेषण करीत असतांना रेकॉर्डवरील गुन्हेगार जिन्नेसिंग उर्फ फार्मुला इंदलसिंग टाक रा.गुरुगोविंदनगर जालना याने केल्याची माहिती मिळाली.
आरोपी जिन्नेसिंग उर्फ फार्मुला इंदलसिंग टाक यांच्याकडुन गुन्हयातील गेला नगदी 37 हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहे.
आरोपी जिन्नेसिंग उर्फ फार्मुला इंदलसिंग टाक याचेकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती मिळाली त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता 03 धारदार तलवारी व 01 खंजीर मिळुन आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सुभाष भुजंग, श्री.प्रमोद बोंडले, दुर्गेश राजपूत, पोउपनि, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर यांनी केलेली आहे़