घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आज (दि.१९) शनिवार रोजी करण्यात आले.
यामध्ये भूमिगत गटार योजनेच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.पिंपरखेड हे जि.प.गटातील चौथा गाव जे भूमिगत गटार ने पूर्ण होत आहे. यामुळे गाव डास मुक्त, दुर्गंधी मुक्त व स्वच्छ होत आहेत. गावातील लोकांना याचा प्रचंड फायदा होत असून रोगराई कमी होत आहे. यासोबतच भगवानबाबा मंदिरामध्ये सार्वजनीक शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या सोबतच बिरोबा मंदिरामध्ये पेव्हर ब्लॉक,शिवपुरी शिरसपुरी मंदीर शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित जि. प. सदस्य जयमंगल दादा जाधव,अशोकराव आघाव ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा सरपंच पिंपरखेड, रमेश धांडगे अध्यक्ष विद्युत वितरण घनसावंगी, विष्णू काका रक्ताटे उपसरपंच पिंपरखेड, भिमराव सिरसाठ,आंनद माने,मंजाबा जायभाय,सुरेश जायभाय,महेश आघाव,सोमनाथ घुगे,स्वामी ब्रम्हानंद पुरी, कैलास आरडे
श्रीराम मोरे,नारायण पटेकर,भगवान घुगे आदी गावातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!