त्या अपशब्दबाबत आ. लोणीकर यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी
कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी आ बबनराव लोणीकर यांच्यावर आरोग्यमंत्री टोपे यांच्याविरोधात काढलेल्या अपशब्द बाबत पोलीस कारवाईची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शासनाची पूर्व परवानगी न घेता जिल्हाधीकारी यांच्या दालनात ठीय्या आंदोलन करून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विषयी असंविधानिक भाषेत अपशब्दा मध्ये महाराष्ट्र व जालना जिल्हयातील जनतेचा अपमान केल्या प्रकरणी आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर तत्काळ कारवाई करुन अदखलपात्र गुन्हा दाखल करावा .
अर्वाच्य भाषेत बोलुन गैरवर्तन करणाऱ्या आ.बबनराव लोणीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास घनसावंगी तालुक्यामध्ये तीव्र जन अंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी .
असे आवाहन राष्ट्रवादी पार्टी कार्यकर्ते यानी केली.
यावेळी उपस्थित दिलीप राऊत, सुशिल तौर, दत्तात्रय कंटुले, विजय कंटुले, नामदेव राऊत, बाळासाहेब तांगडे, सुधाकर साबळे, अन्नवर पठाण , राहुल काळे , अरविंद पवार, अजिम पठाण, जुमान पठाण, बबलु गुजर, राजाभाऊ तौर, विष्णु आर्दड, रवींद्र आर्दड,गणेश सोळंके, अविनाश घुगे, राजेश केदार, बबलु आर्दड, करण खरात, शिध्दु गाडे,व आदींची उपस्थिती होती