जालन्यात कत्तलखान्यात जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला; लाखोंचा मुद्देमाल जप्त
चंदनझिरा पोलिसांची यशस्वी कामगिरी,5 जणांना अटक
न्यूज जालना (प्रतिनिधी)
कत्तलखान्यात एका टेम्पोतून 9 जनावरे घेवून जाणारा टेम्पो आज दि.( 21) रविवार रोजी चंदनझिरा पोलिसांनी पकडला आहे. यात एक टेम्पो,जनावरे असा एकुण पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,जालना शहरातून नवीन मोंढामार्गे एक टेम्पो जनावरांना कत्तलखान्यात घेवून जात असल्याची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांना शनिवारी सायंकाळी मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांच्या एका पथकाने मोंढा रोडवरील वरकड हास्पिटलजवळ पोलिसांनी सापळा रचून सदरील टेम्पो पकडला आहे.या टेम्पोत 9 गोऱ्हे आढळून आले.त्यांना ताब्यात घेवून गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.
तर टेम्पो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक शेख शकील,शेख नजीर,गयास हसन कुरेशी, इलियास अब्दुल रहिम कुरेशी (सर्व रा.जुना जालना) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलीस निरिक्षक देविदास शेळके, सहाय्यक निरीक्षक संदीप सावळे,पोलीस जमादार संजय गवई किरण चव्हाण,साई पवार, राजू पवार, रवि देशमुख यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.