घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शेततळ्यासह वैयक्तिक लाभांच्या कामांचे मस्टर सुरू करा-शिवसेना गटनेते अनिरूद्ध शिंदे यांची मागणी

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

शेततळ्यासह वैयक्तिक लाभाच्या कामांचे मस्टर सुरू करण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य तथा शिवसेना गटनेते अनिरूद्ध शिंदे यांनी आज दि.(22) रविवार रोजी घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,घनसावंगी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या शेततळ्यासह,बांधावर वृक्ष लागवड करणे अशा वैयक्तिक लाभांच्या कामांचे मस्टर नोंव्हेंबर महिना संपत आला असून तरी देखील काम बंद आहे. तसेच इतर सर्व कामे बंद असल्याने मजुरांना काम उपलब्ध नाही.बाकीच्या सर्व तालुक्यात हि कामे सुरू असताना फक्त घनसावंगीचे गटविकास अधिकारी यांच्या उदासीन धोरणामुळे बंद असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तातडीने वैयक्तिक लाभाच्या कामाचे मस्टर सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर घनसावंगी तालुका शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर संदिप कंटुले,गणेश राठोड, आबासाहेब मिरदुडे,अभय कुलकर्णी, कांतीलाल शिंदे,प्रल्हाद जाधव,बापुराव शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!