….आता मोबाईल फोन चे सर्व रीचार्ज 20 टक्क्यांनी वाढणार ?
दिल्ली : सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये कमालीची स्पर्धा वाढली आहे, या कंपन्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी बाजारात सतत नवीन आणि स्वस्त प्लॅन (vi,jio,airtel) ऑफर करत असतात. दरम्यान, सर्व कँपनी नुकतेच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवण्याची घोषणा करत युजर्सना मोठा झटका देणार असल्याच्या तयारीत आहे.
त्याच पाठोपाठ आता सर्व कँपनी जसे की,vi, jio, airtel एकाच वेळी त्यांच्या 15 प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत. कंपनीने त्यांच्या या प्लॅनच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या नवीन किमती २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
नेमके असे असू शकतात रीचार्ज
यात प्रीपेड प्लॅन्सच्या टॅरिफ दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. या नवीन किंमत 26 नोव्हेंबरपासून लागू होतील. म्हणजेच 26 नोव्हेंबरपासून तुम्हाला कुठलाही प्रीपेड प्लॅन खरेदी करण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. रिपोर्टनुसार, कंपनीने 15 प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. तर येत्या काळात एअर टेल सह व्होडाफोन आणि जिओ देखील त्यांचे प्लॅन महाग करणार आहे ?, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या खिशाला अणखीनच झळ बसणार आहे.
28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले प्लॅन चे रेट 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅनची किंमत वाढवली आहे. त्यानंतर यूजर्स आता 79 रुपयांचा प्लॅन हा 99 रुपयांना खरेदी करावा लागेल. ?
तर 149 रुपयांच्या प्लॅनसाठी 179 रुपय मोजावे लागतील. तर 219 रुपयांचा प्लॅन आता 265 रुपयांवर महागला आहे. त्याच वेळी, 249 रुपयांच्या प्लॅनची किंमत 298 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय 299 रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सला 359 रुपये द्यावे लागतील.?
56 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले प्लॅन च्या वापरकर्त्यांना आता 399 रुपयांचा प्लॅन 479 रुपयांमध्ये मिळेल. त्याच वेळी, 449 रुपयांच्या प्लॅनची किंमत 549 रुपये करण्यात आली आहे.एअरटेलचा 84-दिवसांचा प्लॅन ने आपल्या 84-दिवसांच्या व्हॅलिडीटीच्या प्लॅनची किंमत वाढवली आहे. 455 रुपयांचा प्लॅन आता 598 रुपयांचा झाला आहे. तर 598 रुपयांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 719 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, 698 रुपयांच्या प्लॅनची किंमत 839 रुपये करण्यात आली आहे.?
365 दिवसांचा व्हॅलिडीटी प्लॅन आपल्या 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीच्या प्लॅनची किंमत वाढवली आहे. 26 नोव्हेंबरपासून 1,498 रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सना 1,799 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, 2,498 रुपयांचा प्लॅन आता महाग होईल आणि 2,999 रुपयांना मिळेल. डेटा अॅड-ऑन पॅकही महागला आपल्या डेटा Add On पॅकची किंमत वाढवली असून आता 48 रुपयांच्या प्लॅनसाठी यूजर्सला 58 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, 98 रुपयांचा प्लॅन 118 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर 251 रुपयांच्या प्लॅनची किंमत 301 रुपये करण्यात आली आहे.