जालना जिल्हा
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची रक्कम चोरट्यांनी 15 लाख रुपये लांबविले
जालना प्रतिनिधी
जालना अंबड रस्त्यावर गोलापांगरी जवळ भरदिवसा लुटमार
जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखा जालना येथून गोलापांगरी येथील शाखेतून आज दि.26 शुक्रवार रोजी 15 लाख रूपये दोन कर्मचाऱ्यांमार्फत मोटारसायकल वरून रक्कम पाठविण्यात आली होती.रक्कम घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोटारसायकल एका इंग्रजी शाळेजवळ मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी अडवून मारहाण केली व पैशाची बॅग घेवून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.