जालना जिल्हा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन
जालना, दि. 7 (न्यूज जालना) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमीत्त जालना येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयीचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन माजी सैनिक भाऊसाहेब पघळ यांनी केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याविषयीची व त्यांचेवरील ग्रंथाविषयीची माहिती दिली.
याप्रसंगी अनिल बावीस्कर, शंकर पवार, साजेद शेख, ऋषिकेश झुंजकर, धीरज पाखरे, मिलींद शिदे, रोहित काळे, सोनु आवटे, सत्यशील वाहुळकर, शाम काळे, विनोद दंवडे, वैभव जोशी, प्रदीप कोपरगे इ. उपस्थिती होती अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी जालना यांनी सांगितले आहे