जालना जिल्हा
जालना जिल्ह्यातील 10 पोलीस नाईकांना हवालदारपदी पदोन्नती
जालना: जिल्हा पोलिस दलातील दहा पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी आदेश काढले आहेत.
जिल्हा पोलीस दलातील खालील पोलीस नाईक यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातील नापोकॉं. कृष्णा चव्हाण, बाबासाहेब जऱ्हाड, संजय कुटे, रामप्रसाद पहुरे, श्रीमती पुष्पा खरटमल, मोटार परिवहन विभागातील सुभाष नागरे, अशोक पोतदार, टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पंडित गवळी, शहर वाहतूक शाखेचे चैनसिंग खोकड आणि सदर बाजार पोलिस ठाण्यातील नारायण फुलमाळी यांचा समावेश आहे.