बदनापूर तालुका

गुप्तधन काढणारे तिघेजण बदनापूरात अटक

जालना : बदनापूर शहरातील एका वाड्यात जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्या टोळीचा मंगळवारी रात्री पर्दाफाश केला आहे . या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून , तीन जण फरार झाले आहेत . धर्मदास गोपालदास ( ४५ , रा . पालघर ) , विजय फुलचंद सहाले ( ४६ , भिवंडी ) , उत्तम विठ्ठल दाभाडे ( रा . धोप्टेश्वर , ता . बदनापूर ) या संशयितांना अटक करण्यात आली आहे . शहरातील कुंभार गल्लीतील एका वाड्यामध्ये काही जण जादूटोणा करून गुप्तधन काढत होते . गुप्तधन काढण्यासाठी मंत्रोच्चार करून खड्डा खोदला जात होता . हा खड्डा नऊ फुटी खोल केला होता आणि प या खड्ड्यात एक सुरंग काढण्यात आली होती , याची माहिती बदनापूर

images (60)
images (60)

पोलिसांना मिळाली . माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धर्मदास गोपालदास , विजय फूलचंद सहाले , उत्तम विठ्ठल दाभाडे यांना ताब्यात घेतले . तर जावेद खान महबूब खान , साजिद खान महबूब खान , फेरोज पठान ( रा . बदनापूर ) हे फरार होण्यात यशस्वी झाले , अशी माहिती पोलिसांनी दिली . यावेळी एक व्यक्ती जमिनीवर झोपलेली होती . त्याच्या अंगावर लाल रंग आणि लिंबू टाकलेले होते . पोलिसांना घटनास्थळी पितळाचा तांब्या , ४ नारळ , कुंकू लावलेले लिंबू एक लालसर रंगाचे कापड , लोखंडी टिकास , फावडे असे साहित्य आढळून आले . फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत असून , या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!