जालना क्राईमजालना जिल्हाबदनापूर तालुका

जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टरचा शोध लावण्यात पोलिसांना अखेर यश


जालना प्रतिनिधी

images (60)
images (60)

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टरचा शोध लावण्यात पोलिसांना अखेर यश

चंदनझिरा पोलिसांनी नगर जिल्ह्यातील नेवासा येथून ट्रॅक्टर केला जप्त,ऊस वाहतुकीसाठी भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर परस्पर विक्री केल्याचे उघड

बदनापूर तालुक्यातील राळा अन्वी येथील शेतकरी संतोष धोंडीबा पाटोळे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये सोनालिका कंपनीचा नवीन ट्रॅक्टर (क्र. एममच 21, बी क्यू- 9303) खरेदी केला होता. सदर ट्रॅक्टर एक लाख रुपये भाड्याने पाटोळे यांचा मित्र रामू गुणाजी राठोड (रा. वंजारवाडी- दाबका तांडा) घेतला होता. सदर ट्रॅक्टर राठोड याने नगर जिल्ह्यातील खडके साखर कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी लावला होता. त्यानंतर रामू राठोड याने पाटोळे यांना ट्रॅक्टरचे भाडे दिले नाही आणि ट्रॅक्टरही वर्षभरानंतर परत केले नाही.त्यानंतर संतोष पाटोळे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी 21 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात आरोपी रामू राठोड याचा न्यायालयातून जामीन झाला होता, त्यामुळे ट्रॅक्टरचा तपास थंडावला होता. ट्रॅक्टरचा शोध लागत नसल्यामुळे संतोष पाटोळे यांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती व तपास चक्रे वेगाने हलली.

अखेर चंदनझिरा पोलिसांना या ट्रॅक्टरचा शोध लावण्यात यश आले आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खरवंडी शिवारातून हे ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तेथील एका शेतकऱ्याला रामू राठोडने हा ट्रॅक्टर परस्पर विकला होता. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, उपनिरीक्षक गणेश झलवार, पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले, राहुल काकरवाल, चंद्रकांत माळी आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!