जमिनी संपादनात शासनाकडून दुजाभाव
हिवर्डी परिसरातील शेतकऱ्यांचा मोजणीस विरोध
जालना (प्रतिनिधी) ः बहुचर्चीत समृध्दी महामार्गात जमिन संपादन करतांना शासनाच्या वतीने जमिनीची परिगनना करतांना गुणांक घटक 2.00 यानुसार शेतकऱ्यांना मावेजा देण्यात आला आहे. परंतू याच राष्ट्रीय महामार्गाला जोडून प्रस्तावित असलेल्या जालना – नांदेड द्रुतगती महामार्गासाठी जमिनीचे संपादन करतांना गुणांक घटक 1.00 लावण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय झाला आहे. त्यामुळे जालना तालुक्यातील हिवर्डीसह इतर गावातील शेतकऱ्यांनी या मोजणीस विरोध दर्शविला आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जालना तालुक्यातील मौजे हिवर्डी येथील राजपत्रात नमूद गट क्रमांकामधील शेतकरी आहोत दि. 6 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार या पुढे राष्ट्रीय व राज्य माहामार्ग प्रकल्पासाठी जमिनीची भू-संपादन करतांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रक्कमेची परीगनना करतांना गुणांक घटक 1. 00 आसे जाहीर केलेले आहे. परंतु या पूर्वी मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गासाठी जमिनीचे भू-संपादन करतांना गुणांक घटक 2. 00 नुसार शेतकऱ्यांना मावेजाची रक्कम दिलेली आहे. तसेच बाजार भावाच्या पाचपट मोबदला देण्यात आलेला आहे. असे असतांना त्याच महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणून जालना ते नांदेड द्रुतगती माहामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. दि. 6 डिसेंबर रोजीच्या शासन निर्णया नुसार शेतकऱ्यांवर एक प्रकारे आन्यय होत असून जी जमीन शेतकऱ्यांना पिढीजात उपजीविकेचे साधन आहे ते शेतकऱ्यांकडून कवडीमोल घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम शासनाच्या या निर्णया मुळे होत आहे. महामार्गाचे काम करतेवेळेस लगतच्या शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत देखील कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. मोबदला मिळाला तरच आपल्या राष्ट्रहित निर्णयाचा फायदा होईल अन्यथा आम्हाला शांततेचा संयमाचा मार्ग सोडून सामुहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. शासन निर्णय रद्द करून सदरच्या शेत जमिनीचा प्रश्नाचा खुलासा होत नाही तो पर्यंत शेतामध्ये संयुक्तिक मोजणी तसेच कोणतीही कार्यवाही करू देणार नाही नसल्याचे देखील निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
निवेदनावर काशिनाथ काळे, वसंत भुतेकर, अशोक काळे, अनिल भुतेकर, रंजीत चोरमार, पांडूरंग भुतेकर, श्रीपाद भुतेकर, रामलाल लूंगाडे, राम सराटे, गणेश भुतेकर, मंगेश बोळे, राजू सातपुते, रामेश्वर खंडागळे, गणेश सराटे, कैलाश लुंगाडे आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.