भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने सोमवारी पीकविमाबाबत धरणे आंदोलन !
जालना प्रतिनिधी :- जालना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे पीकविमा धारक शेतकर्यांचे धरणे आंदोलन
दि 27 वार सोमवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पासून अखिल भारतीय किसान काँग्रेस च्या वतीने रिलायन्स इंशुरनस कंपनी विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
हया विमा कंपनी ने 2021 खरिप विमा काढलेल्या काहीच शेतकऱ्यांना विमा वाटप केले, ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सांगण्यात आले की ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी मध्ये पिकांचे नुकसान झाले याची माहिती 72तासाच्या आत कंपनी ला आँनलाईन किंवा आँफलाईन माहिती दिली अशाच शेतकऱ्यांना विमा देण्यात आला, परंतु अतिवृष्टी मध्ये सर्वच शेतकऱ्यांना नुकसान सोसाव लागले, विमा संरक्षण पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे
एकीकडे पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन ही हक्काचे विमा संरक्षण मिळाले च पाहिजे, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान दिले ते पिकांचे नुकसान झाले म्हणून च ,तरी सुध्दा केवळ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर माहीत नसलेली बाब म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करण्यात न आलेल्या जाचक अटी मुळे हक्काचं पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सोमवार रोजी सकाळी 10 वाजता शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात , विमा भरलेल्या पावत्या सह उपस्तीत राहवे असे आव्हान अखिल भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाअध्यक्षनारायण वाढेकर यांनी केले आहे.