जालना क्राईम

व्यापाऱ्याला चाकुचा धाक दाखवून साडेतीन लाख रूपयांची चोरी

कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारातील घटना

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी / संभाजी कांबळे

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात एका व्यापाऱ्यांला चाकुचा धाक दाखवून पैसाची बॅग हिसकावून साडेतीन लाख रूपये लंपास केल्याची घटना आज दि.5 बुधवार रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.दरम्यान नागरीकांच्या सतर्कतेमुळे आरोपी़ंना पकडण्यात यश मिळाले.


याबाबत सविस्तर वृत्त असे की,विवाहमांडवा ता.पैठण जि.औरंगाबाद येथील व्यापारी ज्ञानेश्वर शेषेराव बडे हे आज कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात भुसार माल खरेदी करण्यासाठी आले होते.त्यांचे साथीदार अशोक ठोंबरे व रमेश राठोड हे ताडपत्री टाकीत असतानी एका अनोळखी व्यक्तीने व्यापाऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून रक्कम पळविण्याचे प्रयत्न केले. व्यापाऱ्यांने रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केले. परंतु चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून साडेतीन लाख रूपये लंपास केले.रमेश राठोड यांनी कुंभार पिंपळगाव येथील पोलीस चौकीत येवून सदरील अनोळखी व्यक्ती हनुमान माने व परमेश्वर खरात हे राजाटाकळी ता.घनसावंगी येथील असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात दिवसेंदिवस चोरींच्या घटनेत वाढ होत असून आठवडी बाजारात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!